Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Calangute: कर्नाटकच्या दोघा पर्यटकांना मारहाण करून लुटले; कळंगुटमधील प्रकार, तिघांना अटक

30 हजार रूपये जबरदस्तीने करायला लावले ट्रान्सफर

Akshay Nirmale

Calangute: कळंगुटमध्ये कर्नाटकच्या दोघा पर्यटकांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या पर्यटकांना मारहाण करत त्यांच्याकडील ३० हजार रूपये जबरदस्तीने युपीआय ट्रॅन्झॅक्शनद्वारे लुटले आहेत. कळंगुट परिसरातील तिघा दलालांनी हे कृत्य केले आहे.

या प्रकरणी सतीशकुमार श्रीनिवास शेट्टी (वय 39 वर्षे) यांनी तक्रार दाखल केली होती. ते मूळचे बस्तरहळ्ळी कोलार कर्नाटक येथील रहिवासी आहेत.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 ऑक्टोबर रोजी एका टुरिस्ट गाईडने कम दलालाने शेट्टी आणि त्यांच्या मित्राला मारहाण केली. यात आणखी दोघेही सहभागी होते. जीवे मारण्याची धमकी देत या दलालांनी शेट्टी यांच्या बँक खात्यातील 30 हजार रूपये युपीआय ट्रॅन्झॅक्शनद्वारे लुटले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तिघाही संशयित टुरिस्ट कम दलालांना अटक केली आहे.

पहिल्या संशयिताचे नाव शारूखखान बशिरअहमद देवागिरी (वय 25 वर्षे) असे आहे. तो सध्या अल्मेडा स्कूल कानका, पर्रा येथील रहिवाशी आहे. तो मूळचा अत्तार स्ट्रीट देविहोसूर हावेरी कर्नाटक येथील आहे.

सिरिल आलेक्स डायस (वय 42 वर्षे) असे दुसऱ्या संशयिताचे नाव आहे. तो सेंट सेबॅस्टियन चॅपेल देवसू पेडणे येथील रहिवासी आहे. तर तिसऱ्या संशयिताचे नाव आहे अविनाश कांती पटेल (वय 32 वर्षे). तो सध्या हनुमान मंदिर खोब्रावाडो कळंगुट येथे राहतो. तो मूळचा दिव दमण येथील आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कळंगुटमधील पोलिस उपनिरीक्षक राजाराम बागकर पुढील तपास करत आहेत. कळंगुट पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परेश नाईक आणि पर्वरीचे एसडीपीओ विश्वेश करपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT