Fir In Calangute
Fir In Calangute  Dainik Gomantak
गोवा

Fire In Calangute Beach: कळंगुट बीचवर अग्नितांडव, दोन शॅक जळून खाक...

दैनिक गोमन्तक

कळंगुट: गोव्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार कळंगुट येथील समुद्र किनाऱ्यावर पहाटे 2.45 च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शॅक जळून खाक झाले आहेत. या घटनेमध्ये सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

(Fire In Calangute Beach)

राज्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी रावणफोंड मिलिट्री कॅम्प जवळ सकाळी एका घराला आणि खाली असलेल्या दुकानांना आग लागून सुमारे 50 लाखांचे नुकसान झाले. ही आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. या आगीत घरासह तीन दुकाने आणि चार वाहनांची हानी झाली.

मागील महिन्यात देखील कळंगुट समुद्रकिनारी असलेल्या शॅकला आग

मागील महिन्यात देखील कळंगुट सावतावाडो येथे दुपारी समुद्रकिनारी असलेल्या शॅकला आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी पिळर्णे येथील अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले. ही घटना घडली तेव्हा पर्यटक शॅकमध्ये बसले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या आगीत 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT