Rent A Bike Scam In Goa Dainik Gomantak
गोवा

Rent A Bike Scam In Goa: सेम टू सेम! मडगावात एकाच नंबरच्या दोन स्‍कूटर्स, रेंट अ बाईकवाल्‍यांचा प्रताप; गाड्यांचा मालक कोण?

Duplicate scooter numbers seized Madgaon: सध्‍या या दाेन्‍ही स्‍कूटर्स वाहतूक पोलिसांनी जप्‍त करून मडगाव पोलिस स्‍थानकावर ठेवण्‍यात आल्‍या आहेत. या दोन्‍ही क्रमांकपट्ट्या बनावट तर नाहीत ना, याचा तपास आता पोलिस घेत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगावातील सिने लता परिसरातून रेंट अ बाईक तत्त्वावर पर्यटकांना दिल्‍या जाणाऱ्या दोन स्‍कूटर्स एकाच रजिस्‍टर क्रमांकाच्‍या असल्‍याचे दिसून आल्‍यावर या भागात आश्‍चर्याबरोबरच खळबळ निर्माण झाली आहे. या स्‍कूटर्सचा मालक कोण, याचाही तपशील मिळत नसल्‍याने याप्रकरणी एक गूढ निर्माण झाले आहे. सध्‍या या दाेन्‍ही स्‍कूटर्स वाहतूक पोलिसांनी जप्‍त करून मडगाव पोलिस स्‍थानकावर ठेवण्‍यात आल्‍या आहेत. या दोन्‍ही क्रमांकपट्ट्या बनावट तर नाहीत ना, याचा तपास आता पोलिस घेत आहेत.

सिने लता परिसरात पार्किंगसाठी ठेवलेल्‍या जागेत या रेंट अ बाईक आणून ठेवतात, अशा तक्रारी यापूर्वी येत होत्‍या. आज मडगावच्‍या वाहतूक पोलिसांनी एक निनावी फोन आला आणि सिने लता परिसरात एकाच क्रमांकाच्‍या दोन बाईक्‍स पार्क करून ठेवल्‍याचे त्‍यांना सांगण्‍यात आले.

मडगावचे वाहतूक पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी आपले उपनिरीक्षक देसाई यांना या परिसरात पाठविले असता तिथे जीए ०८ व्‍ही - ०९९१ या एकाच क्रमांकाच्‍या दोन ॲक्टिव्‍हा स्‍कूटर्स पार्क करून ठेवल्‍याचे त्‍यांना दिसून आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी वाहने ॲपवर हे क्रमांक अपलोड करून पाहिले असता, या क्रमांकाच्‍या दुचाकी कुणाच्‍याही नावावर नोंद नाहीत, हे दिसून आले. यामुळे या प्रकाराचे गूढ वाढले असून मडगावचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक हे या प्रकरणात तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT