Police Suspension Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोव्यात दोन पोलिस कॉन्स्टेबल बडतर्फ! भररस्त्यात राडा, फसवणूक अंगलट, प्रोबेशन काळातच नोकरी गमावली

Two Police Constables Suspended: बाणस्तारी पुलावर सेवा बजावणारे साहाय्यक उपनिरीक्षक विवेक फडते यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित पोलिस कॉन्स्टेबल रजत आडपईकर तसेच पोलिस कॉन्स्टबेल पदासाठी बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी परशुराम सत्पालकर या दोघांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Two Constables terminated from service for misconduct At Goa

पणजी: बाणस्तारी पुलावर सेवा बजावणारे साहाय्यक उपनिरीक्षक विवेक फडते यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित पोलिस कॉन्स्टेबल रजत आडपईकर तसेच पोलिस कॉन्स्टबेल पदासाठी बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी परशुराम सत्पालकर या दोघांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यांच्या बडतर्फीचा आदेश दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी आज काढला.

सप्टेंबर महिन्यात साहाय्यक उपनिरीक्षक फडते यांनी पोलिस कॉन्स्टेबल रजत आडपईकर याला हेल्मेट न घातल्याबद्दल बाणस्तारी येथे थांबविले होते. त्या रागाच्या भरात रजतने फडते यांना मारहाण केली होती. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित केले होते. तो पोलिस सेवेत प्रोबेशनवर होता. त्याच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत असल्याने पोलिस खात्यांतर्गत चौकशीत त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय झाला. तो मडगाव पोलिस स्थानकात सेवेत होता.

बनावट कागदपत्रांमुळे परशुराम गोत्यात

कुडचडे पोलिस स्थानकात पोलिस कॉन्स्टेबल परशुराम सत्पालकर हा पोलिस सेवेत भरती होण्यापूर्वी गृहरक्षक म्हणून पोलिसांत कामाला होता. गृहरक्षकांना पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी जागा राखीव असतात. त्यामध्ये त्याची निवड झाली होती. त्यासाठी आवश्‍यक असलेली दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र त्याने सादर केले होते ते केलेल्या चौकशीत बनावट असल्याचे आढळून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT