Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दोन अपघातांत दोघेजण ठार

म्हापसा येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. बोडगिणी येथे बोशान इमारतीसमोर एका मालवाहू टेम्पोने दुचाकीला ठोकरल्याने अपघातात गंभीर जखमी झालेले जगदीश मंगेश शेटकर (वय 62, रा खडपावाडा, म्हापसा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत शिरसई येथील शैलेश नानोडकर यांचा मृत्यू झाला.

शेटकर हे लोकमान्य बँकेच्या म्हापसा शाखेचे कर्मचारी होते. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. शेटकर हे स्कूटरवरून लोकमान्य बँकेच्या शाखेकडे जात होते. बँकेकडे जाण्यासाठी स्कूटर वळवताच काणकाहून म्हापशाच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू टेम्पोने स्कूटरला जोरात ठोकरले. यात शेटकर गंभीर जखमी झाले.

त्यांना प्रथम जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल पोलिसांनी संशयित टेम्पोचालक धोंडिबा गणपत कोचकर (45, चंदगड) याला अटक केली. संशयित परवान्याविना गाडी चालवत होता.

दुसऱ्या घटनेत सिरसई येथे झारापकर पेट्रोल पंपजवळ गुड्स कॅरिअर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने शैलेश दिलीप नानोडकर (45, रा. नानोडा, डिचोली) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी झाला. शैलेश हे अस्नोडाहून सिरसई येथे झारापकर पेट्रोल पंपवर जीए-07- एच- 7370 क्रमांकाच्या मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी येत होते, तर विरुद्ध दिशेने एमएच-07 एजे-2958 क्रमांकाचा अशोक लेलॅण्ड टेम्पो जात होता.

पेट्रोल पंपजवळ उतरणीवर टेम्पोने मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात शैलेश नानोडकर हे गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी टेम्पोचालक आकाश सुरेश नाईक (28, रा. सालईवाडा, सावंतवाडी) याला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT