Two Officers Suspended In dicholi.
Two Officers Suspended In dicholi. 
गोवा

'पाण्यासाठी' लाच मागणारे डिचोलीतील दोन अधिकारी निलंबित

दैनिक गोमंतक

पणजी: जलजीवन मिशन (JJM) योजनेखाली पाण्याच्या कनेक्शनसाठी  लोकांकडे लाच मागणाऱ्या डिचोली (Dicholi) पाणीपुरवठा विभाग 24 च्या उपविभाग 1 च्या सहाय्यक अभियंता वासुदेव परब व कनिष्ठ अभियंता सिद्धेश नाईक या दोघांना आज निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. लाचसंदर्भातच्या अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे आल्याने त्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता नितीन नेवरेकर यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Two officers suspended for soliciting bribe for water connection in Dicholi)

सर्वण - डिचोली येथील पुष्पा चारी हिच्याकडे जेजेएम योजनेखाली पाण्याच्या कनेक्शनसाठी दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम देऊनही सिद्धेश याने तिला कनेक्शन दिले नाही. या कनेक्शनसाठी जादा पाईप्स लागणार आहेत त्यामुळे आणखी 6 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर पुष्पा हिला कळले की या योजनेखाली मोफत कनेक्शन दिले जाते त्यासाठी लागणारे पाईप्स विभागातर्फे घालण्यात येतात. त्यामुळे तिने यासंदर्भातची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे 26 एप्रिल 2021 रोजी केली होती. 

पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी कार्यकारी अभियंता नितीन नेवरेकर, सहाय्यक अभियंता वासुदेव परब व विभागातील इतर कनिष्ठ अभियंता 15 हजार ते 20 हजार रुपये बिल्डर्सकडून लाच मागतात. हा पैसा बिल्डर्स फ्लॅट विक्रेत्यांकडून वसूल करतो अशी तक्रार बोर्डे - डिचोली येथील पुंडलिक सी. नाईक यांनी 15 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे केली होती. डिचोली पाणीपुरवठा विभागाने त्यासाठी पंचायतीने कनेक्शनसाठी जी संख्या पाठविली होती. त्यापेक्षा अधिक पटीने कामाची निविदा अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला दिली होती. तसेच प्रत्येक घरमालकाकडून 5 हजार ते 10 हजाराची मागणी करण्यात आली होती. ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांना कनेक्शन देण्यात आलेली नाही, अशी तक्रार श्रीपाद गावस याने मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) कार्यालयाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांना याप्रकरणाची चौकशी करून सखोल अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला आहे. तोपर्यंत कार्यकारी अभियंता नेवरेकर यांना कारणेदाखवा नोटीस तर सहाय्यक अभियंता वासुदेव परब व कनिष्ठ अभियंता सिद्धेश नाईक यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LokSabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर; युरी आलेमाव यांचा आरोप

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT