Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: राज्यात दोन नर्सिंग कॉलेज सुरू करणार : राणे

विद्यार्थ्यांची संख्या वाढणार : आरोग्य शिबिराद्वारे ‘आरोग्य लोकांच्या दारी’ पोहोचविण्याचा प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

येणाऱ्या काळात आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवून आणताना युवक-युवतींना आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी उत्तर व दक्षिण गोवा येथे दोन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे.

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बाहेरच्या राज्यात नर्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या राज्यातील मुलांची संख्या कमी होणार आहे, असे प्रतिपादन शनिवार, 25 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मोर्ले-सत्तरी येथे आरोग्य शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.

ते पुढे म्हणाले,‘प्रशासन तुमच्या दारी’ या उपक्रमानुसार आरोग्य शिबिरे आयोजित करून आरोग्य जनतेच्या दारी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालनालयाच्या संचालक डॉ. गीता काकोडकर, आरोग्यमंत्र्यांच्या सल्लागार डॉ. गीता देशमुख, डॉ. नाईक, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, तसेच उपसरपंच, पंच व आरोग्य खात्याचे विविध अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैभव गाडगीळ यांनी केले तर साखळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पै यांनी आभार मानले.

120 कोटींची मोफत औषधे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत राज्यातील जनतेला दरवर्षी सुमारे 120 कोटी रुपयांची मोफत औषधे पुरविण्यात येत आहेत.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होत आहे. येणाऱ्या काळात याहीपेक्षा जास्त सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT