Goa Accidental Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death : अपघाताचे आणखी 2 बळी; गोवेकरांच्या चिंतेत वाढ

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, यात आणखी 2 अपघाती मृत्यूंची भर पडली आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील वाढते अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नावच घेत नाही. आता ही बाब चिंताजनक बनली आहे. अपघाताच्या घटना जशा वाढल्या आहेत तसेच या घटनांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, यात आणखी 2 अपघाती मृत्यूंची भर पडली आहे.

फोंड्यातील बोरीमध्ये एका कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वाराला जबर इजा झाली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यावेळी त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

तर दुसरीकडे, सांगेतील वेळीपवाडा-भाटी येथे दुचाकीची धडक बसल्याने एकजण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे.

अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दरम्यान, वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, गोव्यातील लोक वाहन चालवताना नियम पाळत नाहीत. लोक दारू पिऊन गाडी चालवतात, बेधडक ओव्हरटेकिंग करतात. त्यामुळेच या घटना थांबण्याचे नाव घेत नाही.

पीडब्ल्यूडी, परिवहन आणि गृह विभाग या विषयावर सातत्याने बैठका घेत आहेत. अपघातांची संख्या कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी लोकांनीही सरकारला सहकार्य करावे, तरच आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT