Three arrested in mobile theft Dainik Gomantak
गोवा

Anjuna Mobile Theft Case: हणजुणे, कोलवाळ येथे 1.17 लाख रूपयांची मोबाईल चोरी; केरळमधील दोन, हरियाणातील एकाला अटक

हणजुणे आणि कोलवाळ येथे मोबाईल चोरी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Anjuna Mobile Theft Case: हणजुणे आणि कोलवाळ येथे मोबाईल चोरी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

हणजुणे येथे दोन मोबाईल फोन हिसकावल्याप्रकरणी दोन जणांना तर, कोलवाळ येथे मोबाईल फोन चोरी केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

(Three arrested in mobile theft by Anjuna and Colvale police)

मिळालेल्या माहितीनुसार, हणजुणे येथे चोरी प्रकरणी डॅनियल दास सॅन्डोस आवेरो (वय 27) आणि अमीर शेरवान (वय 25) (दोघेही रा. केरळ) यांना अटक केली आहे. दोघांनी 52,000 रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरी केले.

याप्रकरणी मोहम्मद सिनान यांनी हणजुणे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित आरोपींनी सुरूवातील सिनान यांचा 12 हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि त्यानंतर तक्रारदार यांच्या मित्राचा 40 हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरी केला. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

तसेच, कोलवाळ येथे गगन दीप (रा. हरियाणा) याला अटक करण्यात आली आहे. त्याने 65,000 रूपयांची चोरी केली आहे. याप्रकरणी राजस्थान येथील रहिवासी हरिष कुमार यांनी तक्रार दिली आहे.

संशयित आरोपीने तक्रारदार राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत प्रवेश केला व त्यांचा व मित्राचा 65 हजार रूपये किमतीचे मोबाईल चोरी केले. असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, एक मोबईल जप्त केला आहे. कोलवाळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT