Illegal Fishing Action  Dainik Gomantak
गोवा

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Nilkanth Halarnkar: कायद्यानुसार जे कलम योग्य असेल ते लावण्यात येईल. त्या कलमात जी शिक्षा आणि दंड आहे तो लावण्यात येईल; मंत्री हळर्णकर

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्‍याच्‍या सागरीहद्दीत परप्रांतीय ट्रॉलर्सकडून बेकायदा मासेमारी आणि गुंडगिरी करण्‍याचे प्रकार वाढू लागल्‍याच्‍या तक्रारी मत्स्योद्योग खात्‍याकडे वाढल्‍या होत्‍या. याची दखल घेऊन शनिवारी करण्‍यात आलेल्‍या कारवाईत मालपे-कर्नाटकातील दोन ट्रॉलर्स जप्‍त करण्‍यात आले. त्‍यांच्‍यावर कायद्यानुसार कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

परप्रांतीय ट्रॉलर्सवर यंत्रणा कारवाई करण्‍यासाठी गेली असता पाच ट्रॉलर्स बेकायदा मासेमारी करताना आढळून आले. त्‍यातील दोन ट्रॉलर्स पकडण्यात यश आले. अन्य तीन ट्रॉलर्स पळून गेले. दरम्‍यान, ही कारवाई यापुढेही सुरूच राहील, असे मंत्री हळर्णकर यांनी सांगितले.

कायद्यानुसार शिक्षा आणि दंड; हळर्णकर

अशा ट्रॉलर्सना १० लाख रुपये दंड ठोठावण्‍याचे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्‍यानुसार या दोन ट्रॉलर्सना १० लाख रुपये दंड ठोठावण्‍यात येईल का, असे विचारले असता मंत्री हळर्णकर म्हणाले की, कायद्यानुसार जे कलम योग्य असेल ते लावण्यात येईल. त्या कलमात जी शिक्षा आणि दंड आहे तो लावण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT