brutal Fights In Two Groups Dainik Gomantak
गोवा

Taxi Drivers Fight : कॅसिनो बाहेरील टॅक्सी पार्किंगवरून दोन गटांत हाणामारी; एकावर सुरी हल्ला

परस्परविरोधी तक्रार : स्टँड काढण्याचा प्रस्ताव, जखमींवर उपचार सुरू

दैनिक गोमन्तक डिजिटल

येथील आझाद मैदानावर कॅसिनो कार्यालयाबाहेर उभ्या असणाऱ्या दोन टॅक्सी गटामध्ये ग्राहक सेवा देण्यावरून चर्चा होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी पणजी पोलिसांनी दोन गटांविरोधात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

या झालेल्या हाणामारीत दोन टॅक्सी चालक जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहे. यावेळी हाणामारीवेळी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. अनधिकृत टॅक्सी स्टँडच तेथून काढण्याचा प्रस्तावही पोलिसांनी वाहतूक खात्याला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कसिनोबाहेर अनधिकृतपणे टॅक्सी उभ्या करून ग्राहक घेऊन जात असल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाली. त्यामुळे या अनधिकृतपणे टॅक्सी स्टँडच्या ठिकाणी उभ्या करून ठेवण्यात येणाऱ्या टॅक्सींचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक खात्याला देण्यात येणार आहे.

कसिनो कार्यालयाच्या बाहेर बेकादेशीरपणे काही टॅक्सी चालक वाहने उभी करून ठेवतात. या टॅक्सी चालकांना अधिकृत स्टँड नाही. त्यामुळे कोणीही टॅक्सी चालक या कसिनोमधून बाहेर येणाऱ्या ग्राहकांना गाठतात व टॅक्सीमधून घेऊन जातात.

यावरून काल या टॅक्सी चालकांमध्ये वाद झाला होता. हा वाद चर्चा करून सोडवण्यासाठी आज दुपारी आझाद मैदानावर जमण्याचे ठरवण्यात आले होते. दोन्ही गटाचे टॅक्सी चालक आले असता कालच्या प्रकरणाबाबत चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असताना दोन्ही गटामध्ये वाद झाला.

सोहेलवर चाकूने हल्ला!

यावेळी सोहेलने त्याच्याकडे असलेला चाकू बाहेर काढला, मात्र तो त्याच्या हातातून पडला. त्याचा फायदा उठवून त्यातील एका टॅक्सी चालकाने त्याच चाकूने सोहेल खवासवर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला. पणजी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर जखमींना इस्पितळात पाठवण्यात आले तर त्यानंतर दोन गटाच्या तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT