Morjim Beach: मोरजी येथे समुद्रात बुडून पुणे आणि बंगळुरू येथील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.16) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
फैज अहमद (वय 47, रा. पुणे) आणि राजेश शर्मा (वय 50, रा. बंगळुरू) अशी मृत पर्यटकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक फैज अहमद पत्नी आणि मुलांसह गोव्यात सहलीसाठी आले होते. गुरुवारी पहाटे फैज समुद्रात पोहण्यासाठी गेले असता ते बुडाले. जीवरकांनी त्यांना बाहेर काढून, शिवोली येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पेडणे येथे नेण्यात आले मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तर, राजेश शर्मा मित्रांसोबत गोव्यात सहलीसाठी आले होते. सर्वजण पोहण्यासाठी पाण्यात गेले असता राजेश समुद्रात बुडाले. जीवरक्षकांनी त्यांना बाहेर काढून पेडणे आरोग्य केंद्रात दाखल केले. पण, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.