Goa Police detain 11 persons Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: हैदराबादच्या दोघांना गोव्यात ठेवले ओलिस; 4 कोटी खंडणीची मागणी

हैदराबादमधील दोघांना ओलिस ठेवून त्यांच्या मालकाकडून 4 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी 11 जणांना गुन्हा अन्वेषण शाखेने काल अटक केली.

दैनिक गोमन्तक

Goa News: हैदराबादमधील दोघांना ओलिस ठेवून त्यांच्या मालकाकडून 4 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी 11 जणांना गुन्हा अन्वेषण शाखेने काल अटक केली. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी 10 जण गोव्यातील आहेत, तर एकजण हैदराबादमधील आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित फातोर्डा येथील अल्ताफ सय्यद हा असून इतर सर्व आरोपींना हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. रायबंदर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हैदराबाद येथील दोघांना गोव्यात ओलिस ठेवल्याची तक्रार त्यांच्या कंपनीने हैदराबाद पोलिसांत नोंदवल्यानंतर त्यांनी गोेवा पोलिसांशी संपर्क साधला होता.

तेव्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते.

सूत्रधार ‘पीएफआय’शी संबंधित

या प्रकरणातील मुख्य संशयित अल्ताफ सय्यद हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

इतर संशयितांमध्ये सुनील नाईक (सांगे), निखिल पटेल (फोंडा), शफीउल्ला (मडगाव), जाफर सादिक शेख हसन (सावर्डे), सागर (म्हापसा), निशांत (पर्वरी), अस्लम सय्यद (मडगाव), सादिक शेख (नावेली), जोस आल्ड्रिन (केपे) आणि तुकाराम धोंडगे (हैदराबाद) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT