Ponda Fraud News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: भागीदारीच्या नावाखाली 35 लाखांचा गंडा तर, पर्वरीत पर्यटकांच्या खोलीत 3 लाखांची चोरी

Goa Crime News: गोव्यात कांदोळी येथील कंपनीत भागीदारी देण्याच्या नावाखाली हरियाणाच्या व्यक्तीची फसवणूक केली आहे.

Pramod Yadav

Goa Crime News

गोव्यात भागीदारीच्या नावाखाली 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर पर्वरीत तमिळनाडूच्या पर्यटकांचे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

फसवणुकीची घटना

हॉस्पिटॅलिटी कंपनीत भागीदारी देण्याच्या नावाखाली हरियाणाच्या व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. संशयितांनी कांदोळी येथील ब्लू बेल रिसॉर्ट हॉस्पिटॅलिटी कंपनीत भागीदारी देण्याच्या नावाखाली मनप्रीत सिंग (हरियाणा) याला 35 लाखांचा गंडा घातला.

याप्रकरणी कळंगुट पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

चोरीची घटना

पर्वरीत एका हॉटेलमध्ये थांबलेल्या तामिळनाडूच्या पर्यटकांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तामिळनाडूचे पर्यटक पर्वरीतील मॅग्नीफिक हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान, त्यांच्या खोलीतून तीन लाख किंमतीचे दागिने चोरी झाले असून, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT