Two Foreign Nationals Arrested By Calangute And Delhi Police Dainik Gomantak
गोवा

Crime News: विविध गुन्ह्यांत सहभागी परदेशी जोडप्याला अटक; कळंगुट व दिल्ली पोलिसांची संयुक्त कारवाई

संशयित जोडपे तुर्केनिस्तान व अफगाणिस्तान देशाचे नागरिक आहेत

Rajat Sawant

Two Foreign Nationals Arrested By Calangute And Delhi Police: दिल्ली पोलिसांनी कळंगुट पोलिसांच्या मदतीने दोघा विदेशी आरोपींना कांदोळी येथून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

या दोघा विदेशी आरोपींचा दिल्ली येथे अनेक प्रकारच्या गुन्ह्यांत सहभाग होता. या दोघा संशयितांना दिल्ली न्यायालयाने आरोपी घोषित केले होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विदेशी दाम्पत्यांवर दिल्लीत खुनाचा प्रयत्न करणे, आर्थिक फसवणूक करणे, मानवी तस्करी आदी अनेक गुन्हे दिल्ली पोलिसांत दाखल करण्यात आलेले आहेत.

हे दाम्पत्य सुनावणीला उपस्थित राहत नसल्याने त्यांना न्यायालयांने गुन्हेगार घोषित केले. संशयित आरोपी गोव्यात कळंगुट परिसरात लपून बसल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिस पथक शुक्रवारी कळंगुटमध्ये दाखल झाले.

कळंगुट पीआय मिलिंद भुईंबर, पर्वरी एसडीपीओ विश्वेश कर्पे आणि उत्तर गोव्याचे एसपी निधीन वाल्सन यांच्या देखरेखीखाली एक पोलीस पथक तयार करण्यात आले. कळंगुट पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी दोघांही संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

संशयित आरोपी अझीझा तन्रीकुलयेवा व शेरगेत अफगाण पती पत्नी असून तुर्कमेनिस्तान तसेच अफगाण देशाचे नागरिक आहेत. संशयित दाम्पत्याचा म्हापसा न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड प्राप्त केल्यानंतर पुढील कारवाईसाठी दोघांनाही दिल्लीला नेण्यात आले.

कळंगुट पोलिसांच्या पथकात पीएसआय अनिल पोळेकर, हेड कॉन्स्टेबल लुएन्स परेरा, कॉन्स्टेबल अमीर गरड, विजय नाईक, योगेश बोर्डेकर, पोलिस चालक दीपेश आंबेकर आदींचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT