Goa Fatal Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Fatal Accident: गोव्यात दोन अपघातात दोघांचा मृत्यू

Goa Fatal Accident: पंचवडी, शिरोडा येथील अपघातात टँकर रस्त्यात पलटी झाल्याने बराचकाळ वाहतुक खोळंबली.

Pramod Yadav

Goa Fatal Accident

गोव्यात अपघात ही सरकार आणि वाहतूक खात्यासाठी नेहमीच चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात शुक्रवारी झालेल्या दोन विविध अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

फोंड्यातील वीज खांबाला धडकून दुचाकीस्वाराने जीव गमावला तर शिरोडा येथे झालेल्या टँकर, कार आणि ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी झालेत.

दुचाकी अपघातात दुचाकीस्वारीचा मृत्यू

फोंडा येथील उड्डाणपूलावर भरधाव दुचाकी चालकाने वीज खांबाला धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. जखमी चालकाला फोंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला.

श्रवण हरी नाईक (19 वर्षे, रा. कुंडई) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

Goa Fatal Accident

दुसरा अपघात

पंचवाडी, शिरोडा येथे झालेल्या एका विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. येथे टँकर, कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात टँकरमधील चालक मोहम्मद जागीच ठार झाला तर इतर तिघेजण जखमी झाले आहेत.

दरम्यान, या अपघातात टँकर रस्त्यात पलटी झाल्याने बराचकाळ वाहतुक खोळंबली. फोंडा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर घटनास्थळी दाखल झाले, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Goa Fatal Accident

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT