Chorla Ghat Accident Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat: चोर्ला घाटात महाराष्ट्रातील कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

कार खोल दरीत कोसळल्याने झाला अपघात.

Pramod Yadav

चोर्ला घाटातील अपघातांचे (Chorla Ghat Accident) सत्र सुरूच असून, चोर्ला घाटात रात्री महाराष्ट्रातील एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. चोर्ला घाटातील खोल दरीत कार कोसळल्याने हा अपघात झाला. गुरूवारी (दि.01) रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली.

(Two Died in Car Accident at Chorla Ghat, Goa)

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अर्टिगा कारचा (MH-48-BT- 5968) चोर्ला घाटात रात्री साडे दहा वाजता भीषण अपघात झाला. यामध्ये नूर शेख आणि सुधीर कुमार (दोघेही रा. महाराष्ट्र) या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर चारजण जखमी झाले आहेत. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

Chorla Ghat Accident

चोर्ला घाटात अपघातांचे सत्र काही केल्या थांबेना. अपघातांच्या विविध घटनांमुळे हा घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT