Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलिसांच्या खाकी वर्दीवर आणखी एक डाग; दारुच्या नशेत महिलांची काढली छेड, दोघांचे निलंबन

Panjim Crime News: दोन पोलिसांनी गटारीच्या दिवशी पणजीतील पाटो पुलाजवळील एका क्लबमध्ये दारुच्या नशेत गोंधळ घातला.

Pramod Yadav

पणजी: कायदा आणि सर्वसामान्य जनतेचे रक्षक असणाऱ्या पोलिसांनीच महिला सुरक्षा रक्षकांची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजधानी पणजीत पाटो पुलाजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पणजी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन पोलिसांनी पणजीतील पाटो पुलाजवळील एका क्लबमध्ये दारुच्या नशेत गोंधळ घातला. दोन्ही पोलिसांनी क्लबमधील महिला सुरक्षा रक्षकांची छेड काढून त्यांना त्रास दिला. याप्रकरणी पणजी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात असून, अधिक तपास सुरु आहे.

कायदा आणि जनतेचे रक्षक म्हणून सर्वसामान्य जनता पोलिसांकडे पाहत असते. गोवा पोलिसांनी कोलवा समुद्रकिनारी भीती दाखवून दोन हजार रुपये लाच घेतल्याचा आरोप एका व्यक्तीने केला.

त्यानंतर आता पोलिसांनीच महिलांची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे. यापूर्वी मडगाव पोलिस स्थानकातील पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. तर. फोंडा येथील अपघातात देखील पोलिसांनी गोंधळ घातल्याचे समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT