Calangute Souza Lobo case: Goa police

 

Dainik Gomantak 

गोवा

सौझा लोबो प्रकरणात तब्बल दोन कॉन्स्टेबल निलंबित!

कळंगुट पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदारांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय

दैनिक गोमन्तक

Calangute Souza Lobo case: पोलिस निरीक्षक नोलास्को रापोसो यांना सौझा लोबो रेस्टॉरंट हल्ला प्रकरणातील तपासात चुकीची हाताळणी केल्याबद्दल निलंबित केल्यानंतर दोन दिवसांनंतर, शनिवारी कळंगुट पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदारांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असल्याने त्यांना देखील निलंबित करण्यात आले तसेच परिणामाला सामोरे जावे लागले, अशी माहिती असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना दिली.

कळंगुट (Calangute) येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील चौघा संशयितांना 12 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी बजावण्यात आली होती अशी माहिती कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ (Police Inspector Nolasco Raposo) यांनी दिली.

नाईकवाडा-कळंगुट येथे रात्री उशिरा सुरक्षा रक्षक स्वप्नील रेडकर (30, रा. तोर्डा-पर्वरी) याच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याबद्दल पोलिसांनी संशयित टारझन पार्सेकर (नागोवा) सूर्यकांत कांबळी (ताळगाव) इमरान बेपारी (सांताक्रूझ) आणि सूरज शेट्ये (मेरशी) यांना अटक केली. हे सर्व संशयित हल्ला करून सिंधुदुर्गात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कळंगुट तसेच पेडणे पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून त्यांना जेरबंद केले होते.

कळंगुट पोलिस तसेच नाईकवाडा येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले डिस्को क्लब चालविणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांत मतभेद निर्माण झाल्याने एकमेकांचा वचपा काढण्यासाठीच या भागात सुरक्षा रक्षकाचे काम करणारा स्वप्नील रेडकर याच्यावर संशयितांनी जीवघेणा हल्ला केल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT