Margao Accident Dainik Gomantak
गोवा

Margao Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच! वेळ्ळीत कारच्या धडकेत दोन युवती जखमी

मडगावमध्ये कॉलेजच्या दोन युवतींना कारची जोरदार धडक बसली.

Kavya Powar

Margao Accident News: राज्याला जणू अपघातांचे ग्रहणच लागले आहे. मडगावमध्ये कॉलेजच्या दोन युवतींना कारची जोरदार धडक बसली. या धडकेत दोघीही जबर जखमी झाल्या आहेत.

माहितीनुसार, काल (गुरुवार) ही घटना घडली आहे. युवती त्यांच्या दुचाकीवरून जात असताना वेळ्ळी येथे समोरून येणाऱ्या बोलेरो कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघी जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शानया डिसोझा आणि शानया रॉड्रीग्स असे जखमी झालेल्या युवतींची नावे असून दोघीही बाणावलीमधील रहिवासी आहेत.

दरम्यान, या अपघातात नेमकी चूक कुणाची होती याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र राज्यभरात वाढलेल्या अपघातांच्या घटना चिंतेची बाब बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT