Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लोखंडी सळईने मारहाण, शिवीगाळ अन् धमकी; दोन सख्ख्या भावांवर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला, सांकवाळ हादरलं

Sancoale Crime: गोव्यातील सांकवाळ येथील होली चर्च परिसरात दोन तरुणांनी दोन भावांना अमानुषपणे मारहाण आणि शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

वेर्णा: सांकवाळ येथील होली चर्च परिसरात दोन तरुणांनी दोन भावांना अमानुषपणे मारहाण आणि शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हिंसक चकमकीत एका भावाच्या डोक्याला आणि अंगाला लोखंडी सळईने गंभीर इजा झाली असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वर्णा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

किरकोळ वादातून मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, सांकवाळ येथील चर्चच्या परिसरात ही घटना घडली. दोन संशयित तरुणांनी दोन भावांना गाठून प्रथम त्यांच्याशी हुज्जत घातली. हा वाद इतका विकोपाला गेला की संशयितांनी भावांना शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली.

केवळ शाब्दिक चकमकीवर न थांबता, तरुणांनी सोबत आणलेल्या लोखंडी सळईने भावांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक भाऊ गंभीर रक्ताळला असून त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.

ठार मारण्याची धमकी

हल्लेखोरांनी केवळ मारहाणच केली नाही, तर पीडित भावांना धमकीही दिली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पूर्ववैमनस्यातून किंवा अचानक उद्भवलेल्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वेर्णा पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

पीडित भावांनी दिलेल्या तक्रारीवरून वेर्णा पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि धमकावल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT