पणजी: अजगराची अमानवीय आणि त्रासदायक हताळणी केल्याप्रकरणी दोन तरुणांविरोधात वन खात्याने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी करंझाळे येथून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओची उत्तर गोवा वन विभागाने दखल घेत प्राथमिक तक्रार अहवाल (POR) दाखल केला आहे. दोन्ही तरुणांची माहिती मिळाली असून, पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.
करंझाळे येथे दोन तरुणांनी एक अजगर पकडून त्याचा व्हिडिओ चित्रित केला होता. व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्राण्याबाबत जागृक असणारी संस्था पेटाने याची दखल घेतली.
पेटाने आवाज उठवल्यानंतर वन विभागाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, पुढील कारवाई सुरु आहे. वन विभागाकडून दोन्ही संशयितांची ओळख पटली असून, त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. प्राण्यांसोबत अमानवीय कृत्य केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई केली जाते.
वन्यजीव संरक्षक कायदा १९७२ अंतर्गत भारतीय अजगर संरक्षित प्रजाती म्हणून सूचिबद्ध करण्यात आले आहे. अजगरासोबत अमानवीय कृत्य केल्याप्रकरणी सात वर्षांचा तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही संशयितांची ओळख पटली असून, त्यांची सध्या चौकशी सुरु आहे. अजगरासोबत अमानवीय कृत्य करुन त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केल्याप्रकरणी वन विभागाने दखल घेतलीय. अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.