Goa Accident News  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: पणजीहून वेर्णाकडे जाताना काळाचा घाला! कुठ्ठाळी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, आसामच्या दोघांचा मृत्यू

Cortalim Flyover Accident: गोव्यातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गावरील कुठ्ठाळी उड्डाणपुलावर रविवार (14 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला.

Manish Jadhav

पणजी: गोव्यातील महत्त्वाच्या वाहतूक मार्गावरील कुठ्ठाळी उड्डाणपुलावर रविवार (14 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातात भरधाव दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, हा अपघात (Accident) रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला. दुचाकीस्वार पणजीहून वेर्णा दिशेने प्रवास करत असताना उड्डाणपुलावर असलेल्या दुभाजकाला (Divider) त्यांची दुचाकी जोरदार धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी वेळही मिळाला नाही. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताच्या तीव्रतेमुळे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

मृत तरुणांची ओळख

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे के. एच. ब्रिक्रम सिंघा आणि पारितन सिंघा अशी आहेत. हे दोन्ही तरुण मूळचे ईशान्येकडील आसामचे रहिवासी होते. कामानिमित्त किंवा अन्य कारणामुळे ते गोव्यात वास्तव्याला असावेत. त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना आणि आसाममधील त्यांच्या सहकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. गोव्यात काम करणाऱ्या आसाममधील तरुणांमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई

अपघाताची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करुन अपघाताच्या कारणांची प्राथमिक तपासणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरु आहे. चालकाचे नियंत्रण सुटले होते की, वेगामुळे दुभाजक दिसला नाही, याचा तपास केला जात आहे. कुठ्ठाळी उड्डाणपूल हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने रात्रीच्या वेळी वाढत्या अपघातांवर वाहतूक पोलिसांनी अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

SCROLL FOR NEXT