Thieve CCTV Footage Dainik Gomantak, Canva
गोवा

Goa Crime: चोरट्यांनी पोलिसांच्या हातावर दिली तुरी, स्टेशनच्या खिडकीतून काढला पळ

Maina Curtorim Police Station: दोघेही अट्टल गुन्हेगार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मायणा कुडतरी पोलिसांनी त्यांना अटकही केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कन्हैयाकुमार मंडल याच्या खुनाला एक महिना झाला तरी खरा खुनी कोण याचा तपास लावण्यास अपयशी ठरलेल्या मायणा कुडतरी पोलिसांना आणखी एका नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.

एका भंगार अड्ड्यात चोरी केल्यामुळे अटक केलेल्या दोघा संशयितांनी या पोलिस स्थानकातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळ काढला आहे. पोलिसांनी मात्र, असे घडलेच नाही,असा दावा करून कानावर हात ठेवले.

प्राप्त माहितीनुसार पळालेल्या चोरट्यांची नावे अनिल विश्वकर्मा आणि अनिल लमाणी अशी असून २० जुलै रोजी त्यांनी बोरी पुलाजवळच्या एका भंगार अड्ड्यातून तारेचे बंडल त्यांनी चोरून नेले होते. हे दोघेही अट्टल गुन्हेगार असून त्या दोघांची छबी या भंगार अड्ड्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मायणा कुडतरी पोलिसांनी त्यांना अटकही केली होती.

मात्र, आज या चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन खोलीच्या खिडकीचे ग्रील्स तोडून पलायन केले. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी कानावर हात ठेवत, असे काही झालेच नाही, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

गोव्यात 'शिवसेने'ची मोर्चेबांधणी; प्रत्येक मतदारसंघात शाखा, 30 जागांवर विजयाचे लक्ष्य

मराठी आणि गोव्याचे सीमारेखन

SCROLL FOR NEXT