Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

मुंबई-गोवा महामार्गावर दोन अपघात; कामगारांना घेऊन जाणारी बस उलटली तर ट्रकला चारचाकी धडकून महिलेचा मृत्यू

दोन्ही अपघात पेणजवळ झाले आहेत.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी दोन अपघातांची नोंद झाली आहे. पेण येथे कामगारांना घेऊन जाणारी बस उलटल्याने कामगारांना दुखापत झाली आहे. तर, गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला चारचाकी धडकल्याने यात विवाहीत महिलेचा मृत्यू झाला आहे. पेण नजीक हमरापुर येथे हा अपघात झाला.

ट्रकला चारचाकी धडकल्याने विवाहित महिलेचा मृत्यू

गॅस सिलींडर वाहून नेणाऱ्या ट्रकला चारचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने स्पृहा खवळे वय (वर्ष 24 रा. देवगड) ही महिला जागीच ठार झाली आहे. तर तीचा पती सुमित खवळे (वय वर्ष 28) हा जखमी झाला आहे. देवगडवरून मुंबईला आंबे घेऊन येत असताना त्यांचा हा अपघात झाला.

वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या गॅस सिलींडरच्या गाडीवर त्यांची चार चाकी धडकली. या भीषण अपघातात खवळे यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

कामगारांना घेऊन जाणारी बस उलटली

JSW कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणारी बस भर रस्त्यात उलटली, या अपघातात अनेक कामगार जखमी झाले आहेत. पेणजवळील उचेडे येथे हा अपघात झाला असून, जखमी कामगारांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आकाराने मोठी आणि लांब असलेली बस भर रस्त्यात पलटी झाल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. दरम्यान, तात्काळ पोलिसांनी बस रस्त्यातून हटवली आणि वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी मंदावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT