Porvrorim Murder  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News ...क्रूरतेची सीमा पार, कामाक्षीच्या शरीरावर चाकूचे वीस वार

प्रेमभंगाचा राग : संशयितांना 10 दिवसांची कोठडी

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: प्रेमसंबंध तोडल्याने रागाच्या भरात आपल्या पूर्वाश्रमीच्या ३० वर्षीय मैत्रिणीचा चाकूने वार करून निर्घृण खून केलेला मुख्य संशयित फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड तसेच या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्याला साहाय्य करणारा त्याचा साथीदार निरुपदी कडाकक्ल या दोघांना न्यायालयाने शनिवारी 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कामाक्षी उड्डापनोव हिचा शवविच्छेदनाचा अहवाल शनिवारी (ता.२) सायंकाळी आला असता, यामध्ये तिच्या गळ्यापासून पोटापर्यंत शरीरावर तब्बल चाकूचे २० वार असल्याचे समोर आले. यातून, संशयिताच्या मनात कामाक्षीबद्दल द्वेष व प्रचंड राग दडला होता, हे अधोरेखित झाले. या चाकूच्या वारांमुळेच कामाक्षीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

ही खुनाची घटना बुधवार, ३० ऑगस्ट रोजी घडली होती. कामाक्षी उड्डापनोवा असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून संशयितांनी तिचा मृतदेह आंबोली घाटात ५० फूट खोल दरीत फेकून दिला होता.

नंतर आले वास्तव समोर

संशयित प्रकाशने नंतर आपला मित्र निरुपदीला सोबत घेऊन कामाक्षीचा मृतदेह आंबोली घाटात फेकून दिला होता. ज्या चारचाकीमधून हा मृतदेह नेला होता, ती गाडी प्रकाशच्या मालकीची आहे.

सुरवातीला प्रकाशने कामाक्षीचा मृतदेह आंबोलीच्या घाटात कुठेतरी पुरला असून आपल्याला नेमके ठिकाण माहिती नाही, असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कामाक्षीच्या खुनाची कबुली देत, आपले क्रूर वास्तव पोलिसांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT