Mashal Morcha for Tuyem Hospital Dainik Gomantak
गोवा

मशाल मिरवणुकीत लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे! तुये हॉस्पिटल कृती समितीचे आवाहन; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Tuyem Hospital News: तुये हॉस्पिटलसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून १५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयटीआय ते तुये हॉस्पिटलपर्यंत मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी, ता. १४ (प्रतिनिधी): तुये हॉस्पिटलसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून १५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयटीआय ते तुये हॉस्पिटलपर्यंत मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत तालुक्यातील दोन्ही आमदार, चारही जिल्हा पंचायत सदस्य, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच तसेच पालिका मंडळाच्या सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तुये हॉस्पिटल कृती समितीने केले आहे.

या पत्रकार परिषदेस समितीचे निमंत्रक झुजे लोबो, मांद्रेचे पंच बाळा उर्फ प्रशांत नाईक, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कळशावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण बानकर, जगन्नाथ पार्सेकर, व्यंकटेश नाईक, ॲड. सदानंद वायंगणकर, पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, तुळशीदास राऊत, उल्हास नाईक, माजी सरपंच नीलेश कांदोळकर, सुनील नाईक आदी उपस्थित होते.

तुये हॉस्पिटल गोमेकॉला लिंक असावे, यासाठी मागच्या चार दिवसांपासून तुये हॉस्पिटल कृती समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे. हे आंदोलन कुणा राजकीय पक्ष, सरकार, आमदार यांच्या विरोधात नाही. हा विषय सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडित आहे, त्यामुळे या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहभागी होणे आवश्‍यक आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

प्रशांत नाईक यांनी आमदार जीत आरोलकर यांनी शून्य तासात तुये हॉस्पिटलचा विषय आणि आंदोलनकर्त्याची भावना विधानसभेत मांडली. मात्र आरोग्यमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असे यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT