Goa crime Dainik Gomantak
गोवा

Goa crime: तुये खुनीहल्ला प्रकरण; तिळारी परिसरात नेऊन नर्सला मारण्‍याचा होता डाव? संशयित गौतमला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Tuye Nurse Attack Case: तुये येथे विघ्नाली कुबल (२४) या नर्सवर झालेल्‍या चाकूहल्ला प्रकरणी आता नवनवीन माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: तुये येथे विघ्नाली कुबल (२४) या नर्सवर झालेल्‍या चाकूहल्ला प्रकरणी आता नवनवीन माहिती समोर येत आहे. संशयित गौतम देविदास (२५) याने तिळारी परिसरात नेऊन विघ्‍नाली हिला मारण्‍याचा कट रचला होता, अशी चर्चा सुरू आहे. दरम्‍यान, न्यायालयाने गौतमला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गौतम बेरोजगार असून त्याने विघ्नाली कुबल हिच्‍याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्‍याकडून प्रतिसाद मिळत नसल्‍याने संतापाच्या भरात त्याने हा हल्ला केल्याचा संशय आहे. यापूर्वीही त्याने नर्सवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, त्यासंदर्भात गेल्या महिन्यात त्याच्याविरोधात पेडणे पोलिसांनी कारवाई केली होती. संशयिताकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू तसेच वाहन (जीए-११-एफ-4917) जप्त केले आहे.

प्रकृतीत सुधारणा

जखमी विघ्नाली कुबल हिच्‍यावर सध्‍या गोमेकॉत उपचार सुरू आहेत. तिच्‍यावर शस्त्रक्रिया करण्यात आली प्रकृती सुधारत आहे. तिचा जबाब नोंदवल्यानंतर हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT