Turn to agribusiness using state-of-the-art technology  Dainik Gomantak
गोवा

Goa: "अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी व्यवसायाकडे वळा"

कृषी खात्याच्या 'आत्मा' प्रकल्पांतर्गत डिचोलीच्या विभागीय कृषी कार्यालयात आयोजित 'ग्राफ्टिंग पद्धती' विषयीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन केल्यानंतर सभापती पाटणेकर प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते.

Dainik Gomantak

डिचोली: शेती व्यावसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे नवनवीन प्रयोग पुढे येत आहेत. शेती हे रोजगार तथा आर्थिक कमाईचे साधन बनले असून शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी व्यावसायाकडे वळावे. असे आवाहन डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी केले आहे .

कृषी खात्याच्या 'आत्मा' प्रकल्पांतर्गत डिचोलीच्या विभागीय कृषी कार्यालयात आयोजित 'ग्राफ्टिंग पद्धती' विषयीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन केल्यानंतर सभापती पाटणेकर प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. यावेळी 'आत्मा'चे प्रकल्प संचालक किशोर भावे, विभागीय कृषी अधिकारी निलिमा गावस आदी उपस्थित होते.

उदघाटन सत्रानंतर 'ग्राफ्टिंग-व्यावसायाची संधी' या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डिचोली विभागीय कृषी कार्यालयाचे सहायक कृषी अधिकारी पंकज पोकळे आणि दीपक गडेकर यांनी ग्राफ्टिंग विषयी उपयुक्त माहिती दिली तसेच ग्राफ्टिंगव्दारे व्यावसायाच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात. त्याविषयीही मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत सहभागी शेतकऱ्यांना ग्राफ्टिंग करण्यासाठी लागणारे साहित्य (किट) देण्यात आले.

या कार्यक्रमात किशोर भावे यांनीही आपले विचार मांडले तसेच निलिमा गावस यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. आत्माच्या तांत्रिक व्यवस्थापक अश्वेता पळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT