तुळशीदास फळदेसाई Dainik Gomantak
गोवा

Goa Election: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी तुळशीदास फळदेसाई एकनिष्ठ

चिखली उत्तर डोंगर येथील रहिवासी तथा युवा उद्योजक तुळशीदास फळदसाई याने आपली समाज सेवा अविरत बजावताना जनतेच्या चांगल्या कार्यासाठी सदैव पुढाकार घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी चिखली येथील युवा उद्योजक, समाजसेवक तुळशीदास निळू फळदेसाई यांच्या काणकोण येथील कुटुंबाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची (MGP) निस्वार्थीपणे सेवा बजावलेली आहे. माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली फळदेसाई कुटुंबाने मगो पक्षाबरोबर राष्ट्रीय पातळीवर कार्य केले असल्याची माहिती तुळशीदास फळदेसाई यांनी दिली.

चिखली उत्तर डोंगर येथील रहिवासी तथा युवा उद्योजक तुळशीदास फळदसाई याने आपली समाज सेवा अविरत बजावताना जनतेच्या चांगल्या कार्यासाठी सदैव पुढाकार घेतला आहे. उत्तर डोंगरी चिखली भागात राहून त्यांनी आपले कार्य सर्वा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. काणकोण येथील फळदेसाई कुटुंब म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या नावाने एकेकाळी प्रसिद्ध होते. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई कुटुंबाने बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. नंतर मगोचे आमदार संजय बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा देसाई कुटुंबाने आपली सेवा जनतेपर्यंत पोहोचवले असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली.

युवा उद्योजक तुळशीदास फळदसाई याने चिखली पंचायत निवडणुकीत सुद्धा आपल्या समाजसेवेचा दबदबा कायम ठेवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. दाबोळी, चिखली, बोगमाळो, वाडे भागातील नागरिकांनी तुळशीदास फळदसाई यांनी गोव्यात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणुक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार तुळशीदास फळदसाई याने आपले कौटुंबिक वात्सल्य असलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर स्व. शशिकलाताई काकोडकर यांच्या मगो पक्षासाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. हेच उद्दिष्ट ठेवून फळदसाई यांनी पक्षांशी संपर्क साधून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. जनतेच्या सेवेला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी पक्षात राहून कार्य करण्याचे ध्येय बाळगले असून येणाऱ्या काळात जनतेची सेवा अविरत चालू ठेवणार असल्याचे फळदसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT