Joshua D'Souza Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापसा सिरिंज प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न - डिसोझा

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: अलिकडेच येथील नवीन आंतरराज्य बसस्थानक आवारातील शौचालयाच्या खिडकीवर रिकाम्या सिरिंजचा (इंजेक्शन) (Injection) खच सापडलेला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.

पोलिस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे उपसभापती तथा म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा (MLA Joshua D'souza) यांनी सांगितले. ते शुक्रवारी (ता.29) म्हापशात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

बसस्थानक आवाराच्या शौचालयात सिरिंज सापडणे, हे गंभीर आहे. याची माहिती केटीसीएल तसेच आरोग्य विभागाला दिली आहे. हा प्रकार बसस्थानकात येणाऱ्‍या पर्यटकांकडून झाला की इतर कुणी केला हे माहिती नाही. याचा शोध घ्यावा लागेल. सध्या पोलिस तपास करीत असून अद्याप तरी काहीही समजलेले नाही, असेही जोशुआ यांनी स्पष्ट केले. रिकाम्या सिरिंज सापडण्याचा हा प्रश्न गंभीर असून पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहावे लागेल, असेही जोशुआ म्हणाले.

म्हापशातील विकासकामांवर जोशुआ म्हणाले, की सध्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्याशिवाय शहरात रवींद्र भवनासाठी मी प्रयत्नशील असून विधानसभेत या भवनासाठी दोन जागांची ओळख पटविल्याचे सांगितले आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्यावर माझा भर असेल. मात्र, हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, हे आश्वासन मी आताच देऊ शकत नाही. याशिवाय म्हापसा मार्केटला गतवैभव मिळवून देण्याचा प्रकल्प हाती घेतला जाईल, अशी ग्वाही जोशुआ यांनी दिली.

मला विधानसभेचे उपसभापतिपद मिळणे हे माझे भाग्य समजतो. मला ही मोठी जबाबदारी मिळालेली आहे. या पदाला योग्य न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. उपसभापतीची भूमिका ही नेहमीच तटस्थ असावी लागते आणि सर्व विधीमंडळ सदस्यांना मी आश्वासन दिले आहे की, सर्वांना विधानसभेत बोलण्याचा समान हक्क मिळेल, असेही जोशुआ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT