Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: अंत्यसंस्काराला आपले कर्तव्य मानणारे ‘नाउ’

निस्वार्थीपणे सेवा : शेजारच्या सिंधुदुर्गमध्येही करतात लाकडांची व्यवस्था

दैनिक गोमन्तक

Goa News: मानवी देहातील प्राण निघून गेल्यावर मनुष्यावर शेवटचे संस्कार होतात ती जागा म्हणजे स्मशानभूमी. स्मशानभूमीत येऊन माणसाच्या आयुष्याचा प्रवास संपतो. पण स्मशानभूमीत अशी एक व्यक्ती राबत असते, जी माणसाच्या या अखेरच्या प्रवासात त्याच्या सर्वात जवळ असते.

मृत व्यक्तीला या जगातून निरोप देतानाची सारी व्यवस्था करणारी ही व्यक्ती मात्र कायमच उपेक्षित राहिलेली आहे. ती व्यक्ती म्हणजे मृत व्यक्तीला दहन करण्यास लागणारी लाकडे उपलब्ध करून देणारी.

कडसरे-वारखंड, पेडणे येथील काशिनाथ परब असे नाव असले तरी ‘नाऊ’ या नावानेच गावात ते परिचित आहेत. पेडणे तालुक्यातच नव्हे तर शेजारच्या सिंधुदुर्गमध्येही अंत्यसंस्कारावेळी लाकडांची सोय करून स्मशानातील सर्व तयारी हा माणूस कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणाने करतात. लाकडे कापण्यासाठी नाउ यांनी एक कटरही खरेदी केलेला आहे.

मागे कोरोनाचे संकट सुरू असतानाच चक्रीवादळ झाले व सर्व जनजीवन विस्कळीत झाले. वारखंड भागातील जी झाडे रस्त्यावर पडली होती ती कापून वीज खात्याला त्यांनी सहकार्य केले.

कोविड काळातही पुढाकार

बारावीपर्यंत शिक्षण झालेले काशिनाथ परब आपला संपूर्ण वेळ याच कामासाठी देत आहेत. गावात अंत्यसंस्कार आणि ‘नाउ’ हे तसे समीकरणच झालेले आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या अंत्यसंस्काराला लाकडे करण्यास कुणी येत नव्हते. तिथे धीर देण्यासाठी नाउ उभे. शेती, काजू बागायती, मिरची पीक घेऊन ते उदरनिर्वाह करतात.

अशी माणसे गरजेची

आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र या अशा सेवेतच ‘नाउ’ वावरतात. अशी माणसे खूप गरजेची असतात; पण त्यांची कुणीही दखल घेत नसल्याने उपेक्षित राहतात. समाजाने अशा लोकांचा मानसन्मान राखायला हवा. कारण कठीण, दु:खी प्रसंगांवेळी त्यांचा धीर फार मोठा असतो, हेसुद्धा तितकेच खरे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT