Colvale Truck Accident: Dainik Gomantak
गोवा

Colvale Truck Accident: ट्रकची वीज खांबाला धडक; वीजपुरवठा खंडीत झाल्याने मुशीर वाड्डो भाग अंधारात

वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात मागणी

गोमंतक ऑनलाईन टीम

Colvale Truck Accident: कोलवाळ येथे झालेल्या एका ट्रकच्या अपघातामुळे मुशीर वाड्डो हा भाग अंधारात बुडाला आहे. ट्रकच्या धडकेत वीजेच्या खांबाचे, विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मुशीर वाड्डो या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

या अपघातात वीजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. जीजे 12 बीएक्स 4970 क्रमांकाचा मालवाहू ट्रक सर्व्हिस रोडवर बिनानी कंपनीजवळ उलटला. या रस्त्याची देखभाल नीट न केल्या गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वीज वाहिन्यांचे नुकसान झाले.

त्यामुळे मुशीर वाड्डो परिसरातील 15 ते 20 घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातून केली जात आहे. ट्रक चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे हा ट्रक पूर्ण पलटला. सुदैवाने ट्रक चालकाला या अपघातात काही गंभीर इजा झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT