Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : मांद्रेत भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू

पेडणे परिसरातील अपघातांमुळे रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : मांद्रेत भरधाव ट्रकची एका इलेक्ट्रिक दुचाकीला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी झालेल्या या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सुप्रिया म्हामल असं या मृत महिलेचं नाव आहे. पेडणे परिसरातील अपघातांमुळे रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळी ही महिला आपली इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन घराबाहेर पडली होती. मात्र पेडणे मांद्रे परिसरात आल्यावर एका भरधाव ट्रकची धडक दुचाकीला बसली, ज्यात चालक महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर काहीकाळ परिसरात तणावही पाहायला मिळाला. गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचं काम सुरु आहे. मात्र त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डेही पडल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळे अनेक अपघात या परिसरात झाले आहेत. स्थानिकांनी लवकरात लवकर या महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अजून किती बळी गेल्यानंतर सरकार जागं होणार असा संतप्त सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान मागच्याच महिन्यात तोरसे - येथील बीएड कॉलेजजवळ झालेल्या दुचाकी आणि टेम्पो अपघातात कुडाळ येथील योगेश परब या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर गिरी म्हापसा येथेही नुकताच पर्यटकांच्या कारला अपघात झाला होता, ज्यात महाराष्ट्रातील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT