सावंतवाडी: गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक आंबोली घाटातून दरीत कोसळला. कोसळल्यानंतर ट्रकने पेट घेतला चालकाने वेळीच ट्रकमधून उडी घेतल्याने तो थोडक्यात बचावला पण, यात ट्रक जळून खाक झाला आहे. रविवारी (10 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. धोंडिबा वाघ (वय. 29, रा. धाराशिव) असे या अपघातातून बचावलेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडिबा वाघ गोव्यातून ट्रक घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. सावंतवाडीतील आंबोली घाटातून जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व तो घाटातील दहा फूट दरीत कोसळला. कोसळल्यानंतर ट्रकने पेट घेतला. चालक धोंडिबा यांनी प्रसंगावधान राखत बाहेर उडी मारत स्वतःचा जीव वाचवला. पण या अपघातात ट्रक जळून खाक झाला आहे.
सावंतवाडीतील आंबोली घाट हा एक अवघड घाट म्हणून ओळखला जातो. घनदाट जंगलातून जाणारा हा मार्ग वाहन चालकांसाठी आव्हानात्मक आहे. दरम्यान, घाट भागात वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात. नागमोडी वळणे आणि ब्लाईंड स्पॉटमुळे अपघाताची शक्यता अधिक असते. वाहन चालकांना आंबोली घाटातून प्रवास करताना सतर्क आणि खबरदारी घेण्याची सूचना केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.