Pernem Accident Dainik Gomantak
गोवा

Pernem Accident: सुकेकुळण, पेडणे अपघात प्रकरणात झारखंडच्या ट्रक चालकाला अटक

सुकेकुळण-धारगळ येथे झालेल्या अपघातात एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

Pernem Accident: सुकेकुळण-धारगळ येथे झालेल्या अपघातात एका  दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. मोपा लिंक रस्त्याच्या कामावरील एका ट्रकने शुक्रवारी दुचाकीस्वार नामदेव नारायण कांबळी (वय 63 वर्षे, रा. शेमेचे अडवण) यांना 200 मीटर फरपटत नेऊन चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी झारखंड येथील ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. पेडणे पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली.

शुक्रवारी झालेल्या या अपघातात काशिनाथ तुकाराम शेट्ये (वय 64 वर्षे, रा. वारखंड) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, संतापलेल्या जमावाने तेथील दोन क्रेन पेटवल्‍या होत्या.

दरम्यान, या अपघात प्रकरणात अशोका कंपनीचा ट्रकचालकाविरोधात पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर पोलिसांनी या चालकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

कंत्राटदार, वाहतूक पोलीस, पीडब्ल्यूडी विरोधात FIR दाखल करा; काँग्रेसची मागणी

सुकेकुळण, पेडणे येथे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाहतूक पोलीस, पीडब्ल्यूडी, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रस्ते कंत्राटदार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी काँग्रेसने केली.

मंगळवारी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पेडणे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना घेराव घालून दुचाकीस्वाराच्या हत्येला कारणीभूत असलेल्या ट्रकचालकाला का पकडले नाही, असा सवाल केला. याबाबत काँग्रेसने पोलिसांना निवेदनही दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT