तिळ्या बंधू-भगिनींनी 'पिंक बूथ'वर प्रथमच बजावला मतदानाचा हक्क Dainik Gomantak
गोवा

तिळ्या बंधू-भगिनींनी 'पिंक बूथ'वर प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

वास्को मतदारसंघातील सेंट जोसेफ हायस्कूल येथे मतदान

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को मतदार संघात तिळ्या बंधू-भगिनींनी (Triplets Siblings) पिंक बूथवर प्रथमच मतदान केले. 14 फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील वास्को मतदार संघात सेंट जोसेफ हायस्कूल मधील मतदान केंद्रावर 2003 साली जन्मलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि एक भाऊ या नव मतदारांनी (New Voters) प्रथमच मतदानाचा हक्क बजावला.

यामुळे मुरगाव तालुक्यात तसेच वास्को मतदारसंघात (Vasco Constituency) एक रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहे. वास्कोतील प्रसिद्ध वकील राजीव ढवळीकर यांच्या या तिळ्यांनी नुकतीच आपल्या वयाची अठरा वर्षे गाठली असून त्यांना विधानसभा 2022 निवडणुकीत (Goa Elections 2022) प्रथमच मतदान करण्याचा मान प्राप्त झाला आणि तोही 'पिंकबूथ'मध्ये. त्यानुसार काल त्यांनी वास्को मतदारसंघातील बूथ क्रमांक 11 मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बूथवरील उपस्थित निर्वाचन अधिकारी जेवेंदर कौर आणि बिएलओ सुरेश परब यांनी त्यांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT