Trinamool Congress  Dainik Gomantak
गोवा

तृणमुलने आंतोनियो क्लोविस यांना डावलले

मडगावात महेश आमोणकर तर वेळ्ळीत बेंजामिन सिल्वा

दैनिक गोमन्तक

मडगाव : तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून मडगावची उमेदवारी महेश आमोणकर याना दिली असून दोन दिवसांपूर्वी तृणमुलमध्ये प्रवेश केलेले बेंजामिन सिल्वा यांना वेळ्ळीची उमेदवारी जाहीर केली आहे.

मडगावात सुरवातीला तृणमुलचे उमेदवार म्हणून नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांचे नाव घेत होते, मात्र उमेदवारी शेवटी आमोणकर याना देण्यात आली. वेळ्ळी मतदारसंघात तरुण वकील आंतोनियो क्लोविस याना उमेदवार म्हणून तृणमुलने पुढे आणले होते आणि त्यांनी प्रचारही सुरू केला होता. मात्र ऐनवेळी त्यांना डावलून दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस (Congress) पक्ष सोडून तृणमुल पक्षात सामील झालेले बेंजामिन सिल्वा याना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

काणकोण मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर महादेव देसाई याना उमेदवारी देण्यात आली आहे. अन्य उमेदवारामध्ये कविता कांदोळकर याना थिवी, लियाव डायस याना शिवोली, अँथनी मिनेझिस याना कलंगुट, तर अँथनी पिशॉट यांना कुडतरीची उमेदवारी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT