Trinamool Congress Goa | Trojan Demello Dainik Gomantak
गोवा

Trinamool Congress Goa: कौशल्य विकासासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करा- ट्रोजन डिमेलो

Trinamool Congress Goa: गोवा राज्यात 70 टक्के युवक बेरोजगार आहेत.

दैनिक गोमन्तक

Trinamool Congress Goa: खासगी शैक्षणिक संस्थांना कौशल्य विकासासाठी निधीचा आवश्‍यकता आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली पाहिजे, अशी सूचना तृणमूल काँग्रेसचे प्रसार माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी केली.

पणजीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तृणमूल काँग्रेसचे संयोजक समील वळवईकर आणि पक्ष प्रवक्ते जयेश शेटगावकर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘सीएमआय’ने बेरोजगारीविषयी दिलेला अहवाल मान्य केला आहे. या अहवालानुसार गोव्यात बेरोजगारीचा दर 13 टक्के आहे.

तसेच, त्यानुसार राज्यात 70 टक्के युवक बेरोजगार आहेत. ते पदवीधर असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु यासाठी केवळ सरकार जबाबदार असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली

आहे. गेल्या 10 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे. आता मोपा विमानतळ सुरू होणार हे माहीत. मग सरकारने विमान वाहतूक आणि पर्यटन उद्योगात कौशल्य निर्माण करण्यासाठी काय केले आहे. राज्यातील तरुण आमचे भविष्य असून त्यांच्यासाठी सरकारने काय केले, असा प्रश्‍न ट्रोजन डिमेलो यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT