Luizinho Faleiro resigns as MP  Dainik Gomantak
गोवा

Luizinho Faleiro: गोव्यात भक्कम पर्याय देण्यात तृणमूल काँग्रेस सपशेल अपयशी

फालेरो : खासदारकी सोडली; आता पक्षही सोडण्याची तयारी

गोमन्तक डिजिटल टीम

Luizinho Faleiro गोव्यात काँग्रेस ढेपाळली, तेव्हा तृणमूलच्या रूपात गोव्यात एक चांगला पर्याय निर्माण होणार आणि नावाप्रमाणे हा पक्ष राज्यात पाळेमुळे रुजविणार, अशी अपेक्षा होती. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही केले गेले; पण दुर्दैवाने तसे घडले नाही, अशी खंत खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केली.

राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता, मी तृणमूल काँग्रेसही सोडणार आहे. मात्र, त्यापूर्वी माझ्या हितचिंतकांसह चर्चा करणार आहे, तृणमूल सोडली तरी सध्या अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. भविष्यात काही निर्णय घेतला तर मी तुम्हाला कळवीन, असे ते म्हणाले.

तृणमूल प्रवेशाबद्दल ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरून मी ‘टीएमसी’त सामील झालो होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वधर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येतील, अशी आशा होती. पण तसे झाले नाही. तथापि, माझ्यावर विश्वास ठेवून महत्त्वाचे पद दिल्याबद्दल बॅनर्जींचे आभार मानतो, असे फालेरो म्हणाले.

मी खासदार या नात्याने गोव्यातील अनेक ज्वलंत प्रश्र्न राज्यसभेत मांडले. त्यात म्हादई वाद, पर्यावरण रक्षण, कोळसा प्रदूषण, जुने गोवे वारसा रक्षण आदी महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश होता. मात्र, गोव्यातील खासदार आणि गोव्यातून निवडून आलेला खासदार, यात फरक असतो.

लुईझिन यांची पक्षात घुसमट

तृणमूल फालेरो यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सामील करून घेतल्यानंतर ते गोव्यात पक्ष संघटना उभारतील, अशी पक्ष नेतृत्वाला अपेक्षा होती.

पण विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा सफाया झाला. त्यामुळे फालेरो काही कामाचे नाहीत, अशी भावना पक्ष नेतृत्वात तयार झाली होती.

फालेरो यांनी गोव्यात विधानसभा निवडणूक लढवावी, अशी तृणमूलची अपेक्षा होती; पण त्यांनी तीही नाकारली.

यामुळे केंद्रीय कार्यकारिणीची पुनर्रचना करताना फालेरो यांना सामावून घेतले नव्हते, तसेच गोव्यातही त्यांना काही अधिकार नव्हते. त्यामुळे फालेरो यांची पक्षात घुसमट झाली होती.

...तर दुसरा उमेदवार उभारू : टीएमसी :

फालेराे यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘टीएमसी’ने देखील निवेदन जारी केले. फालेरो यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्‍याने आता ज्‍यावेळी त्‍या मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर होईल, त्‍यावेळी आम्ही त्यांच्या मतदारसंघात दुसरा उमेदवार उभा करू, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

राजीनाम्याची ही आहेत कारणे...

  • लुईझिन फालेरो यांना गोव्यात पक्ष उभारणीत आलेल्या अपयशामुळे पक्षश्रेष्ठी नाराज होते.

  • त्यामुळे त्यांच्यावर खासदारकी सोडण्याची वेळ आली होती.

  • पक्षात मान-सन्मान मिळत नाही, यामुळे फालेरो अस्वस्थ होते.

  • येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस उमेदवारीची ऑफर असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

  • तृणमूलला गोव्यात पक्षविस्तार करण्यात रस नसल्याने या पक्षात राहणे फायद्याचे नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT