Goa Assembly Elections: ‘गोंयाक जाय दीदी’  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections: ‘गोंयाक जाय दीदी’

बंगाल स्थित पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीसाठीची आपली सामाजिक माध्यम मोहीम सुरू केली

दैनिक गोमन्तक

तृणमूलची सोशल मीडिया मोहीम सुरू झाली आहे. आता गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या गळाला किती मोठे मासे लागतात याचे चित्र अजून स्पष्ट झालेले नसले तरी या बंगाल स्थित पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीसाठीची आपली सामाजिक माध्यम मोहीम मात्र सुरू केली आहे.

‘गोंयाक जाय दीदी’ हे या मोहिमेचे ब्रीदवाक्य असून गोव्यासाठी विकास आणि प्रगतीच्या नव्या लाटेत तुमचे स्वागत असा मथळा दीदीच्या फोटोसहीत ठळकपणे टाकण्यात आले आहे. फेसबुक पेजला सध्या 300 लाईक्स आले असून बहुतेक नकारात्मक कॉमेंट्स आहेत. आतापर्यंत काही पक्षांनी चंद्र तारेसुद्धा आणण्याची आश्वासने दिली असल्यामुळे नवीन पक्षांना बरीच कल्पनाशक्ती वापरावी लागणार आहे हे मात्र खरे.

भाजपला हरविण्याची क्षमता

गोव्यात ममतादीदींना गंभीरपणे राजकीय काम करायचे आहे. काँग्रेस पक्ष भाजपविरोधी राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकत नाही. संपूर्ण देशात या पक्षाचे नेतृत्व सपशेल अपयशी झाल्याचा आरोप करताना ममतादीदींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने अनेक पातळीवर भाजपचा विरोध केला आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत या पक्षाला पाणी पाजले. गोव्यात भाजपला हरविण्याची क्षमता तृणमूल काँग्रेसमध्ये असल्याचाही दावा त्यांच्या नेत्यांनी केला. गोव्यात आपल्याला सर्व ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा नेत्यांनी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT