Trinamool congress  Dainik Gomantak
गोवा

'पुढील गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस सत्तेवर'

किर्ती आझाद: राज्यातील पदाधिकाऱ्यांत बदल

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला चांगले यश मिळाले असून येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष सत्तेत येईल असा आशावाद तृणमूल कॉंग्रेसचे गोवा प्रभारी किर्ती आझाद यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वी चार महिने गोव्यात येऊन प्रचंड गाजावाजा करून निवडणुका लढवलेल्या तृणमूल काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये फारसे यश आले नाही. आता तृणमूल काँग्रेसने गोवा प्रभारीची जबाबदारी खासदार महुआ मोईत्रा यांच्याकडून काढून माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्याकडे दिली आहे.

आझाद यांनी राज्यात तृणमूल काँग्रेसमध्ये बदल केले जातील असे संकेत देत येत्या विधानसभा निवडणुकीत पक्ष सत्तेवर असेल असा आशावाद व्यक्त केला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने दाखवलेली प्रगती इतर राजकीय पक्षांपेक्षा शेकडो पट जास्त आहे असे म्हणत पहिल्यांदाच निवडणुका लढवून 8.5 टक्के मते मिळवणे हे आत्तापर्यंत काँग्रेस आणि भाजपला शक्य झाले नव्हते असे म्हटले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये तृणमूल

काँग्रेसचे नेते पक्ष सोडून जात आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, जे आमच्यासोबत राहतील त्यांना एकत्रित करून गोव्यात तृणमूल काँग्रेस वाढवण्यात येईल व लवकरच पक्षात मोठे बदल करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT