Mahadayi Water Dispute  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water: म्हादई प्रश्नावर तृणमूल काँग्रेस आक्रमक; आझाद मैदानावर निषेध मोर्चा

भाजपच्या नेत्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी ‘आपली आई’ म्हादईची विक्री केली आहे, अशी भाजपवर तृणमूल काँग्रेसकडून टीका करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water: म्हादईवरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने कर्नाटकच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मान्यता दिल्यानंतर आता गोमंतकीयांनी पेटून उठण्याची वेळ आली आहे. देश प्रथम, राज्य प्रथम म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी ‘आपली आई’ म्हादईची विक्री केली आहे.

म्हादईचे पाणी वळवल्यास पुढे गंभीर परिणाम होणार आहेत. त्यासाठी गोमंतकीयांनी एकसंध होऊन लढा देण्याची गरज आहे, असे तृणमूल काँग्रेस निमंत्रक सहसमन्वयक समील वळवईकर यांनी सांगितले. म्हादईच्या विषयावरून तृणमूल काँग्रेसने आझाद मैदान येथे मोर्चाकडून जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.

कर्नाटकने आक्रमक भूमिका घेतली असून एक वर्षात प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे विधान केले आहे. या विषयावर गोवा सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. आपली खुर्ची महत्त्वाची असल्याचे गोव्यातील भाजप नेत्यांनी दाखवून दिले आहे.

गोव्याच्या पुण्यभूमीमुळे त्यांना आज सत्ता मिळाली आहे. परंतु या भूमीवर अन्याय केल्यास त्यांना देव देखील माफ करणार नाही, असे वळवईकर यांनी स्पष्ट केले.

म्हादई पाणी वळवल्यास गोव्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार आहे. तसेच निसर्गावरही परिणाम होईल. आज आम्ही उठाव केला नाही, तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत. कर्नाटकात निवडणूक होणार असून म्हादईचा वापर भाजपकडून केला जात आहे, हे चुकीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT