Bhausaheb Bandodkar  Dainik Gomantak
गोवा

रवी नाईक, सुदिन ढवळीकरांकडून भाऊसाहेब बांदोडकरांना आदरांजली

फर्मागुढी - फोंड्यात भाऊसाहेब बांदोडकर यांची पुण्यतिथी पाळण्यात आली.

दैनिक गोमन्तक

फोंडा : फर्मागुढी - फोंड्यात भाऊसाहेब बांदोडकर यांची पुण्यतिथी पाळण्यात आली. काल शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमावेळी फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक, मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर व इतरांनी फर्मागुढीतील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी सुदिन ढवळीकर यांचे समर्थक तसेच ढवळीकर ट्रस्टचे मिथिल ढवळीकर व इतर, तर रवी नाईक यांच्याकडून झालेल्या आदरांजली कार्क्रमावेळी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक तसेच जिल्हा पंचायत सदस्य, माजी सरपंच, पंच सदस्य व इतर नागरिक उपस्थित होते.

यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याला खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य देत विकासाची गंगा राज्यात आणली. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यामुळेच आज गोवा प्रगतिपथावर असून त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे अनेक बाबतीत गोवा सरस ठरला असल्याचे नमूद केले.

भाऊसाहेब बांदोडकर यांच्यामुळे गोव्यात शिक्षित आणि साक्षर समाज निर्माण झाला. गोव्याच्या विकासाला चालना देणारे आणि गोमंतकीयांच्या हिताला प्राधान्य देणारे भाऊसाहेब बांदोडकर हे लोकनेते होते, त्यांचा आदर्श आज प्रत्येकाने घ्यायला हवा, असे रवी नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT