Ramesh Tawadkar X
गोवा

Ramesh Tawadkar: तवडकर म्हणतात, 'मी सभापतीपदी खूश, मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार'; CM सावंतांचे केले कौतुक

Ramesh Tawadkar: मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाबद्दल सभापती तवडकर यांनी सांगितले, की आपण सभापतिपदी अगदी समाधानी व आनंदीत आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: आदिवासी कल्याण खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यातर्फे योग्यप्रकारे हाताळले  जात आहे. मी माझे काम आपण सदैव मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो आहे व त्यांनी ते काम करण्यास कधीच नकार दिलेला नाही. त्यामुळे आदिवासी कल्याण खात्यामध्ये कामे होत नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केलेले आरोप आणि त्यानंतर सुरू झालेला वाद या पार्श्वभूमीवर सभापती तवडकर यांना तुम्हाला आता मंत्रिपद देण्यात येणार का? असे विचारले असता कुणाला मंत्री करावे आणि कुणाला काढावे हे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे असतात. हाही निर्णय मुख्यमंत्री आणि पक्ष घेईल, असे ते म्हणाले.

आदिवासी भवनाबद्दलच्या कामाची प्रगती केवळ त्या खात्याचे संचालक योग्यप्रकारे सांगू शकतील. काम कुठपर्यंत पोहोचले  आहे किंवा नेमका  अडथळा कुठे आहे याची माहिती संचालकांना आहे, असेही तवडकर यांनी सांगितले.

सभापतिपदी मी समाधानी

मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाबद्दल सभापती तवडकर यांनी सांगितले, की आपण सभापतिपदी अगदी समाधानी व आनंदीत आहे. आपण सरकारमध्येच आहे. आता मंत्रिपद  देणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे व पक्ष काय निर्णय घेतो त्यावर ते अवलंबून आहे. एक मात्र खरे सभापतिपदाला मी योग्य न्याय दिला आहे. माझे काम कुठेही अडलेले नाही. यापेक्षा जास्त बोलून मी या विषयाला वेगळे वळण देऊ इच्छित नाही.

समाजाच्या कामाला मी महत्त्व देतो...

‘उटा’ संघटनेबद्दल तवडकर म्हणाले, की आपण या संघटनेचा एक साधा सदस्यसुद्धा नाही. त्याप्रमाणे आपल्यामुळे या संघटनेत दोन गट आहेत किंवा मतभेद आहेत असे बोलणे याला काहीच अर्थ नाही. आपण  संघटनेपेक्षा  समाजाच्या कामाला जास्त महत्त्व देत असतो. आपण १९९६ पासून ‘गाकुवेध’चा क्रियाशील कार्यकर्ता होतो.

२००३ साली आदिवासी मान्यता मिळाल्यावर २००४ साली आठ संघटना एकत्र येऊन ‘उटा’ संघटनेची निर्मिती झाली. २०११ साली आंदोलनापर्यंत माझा सहभाग होता. तेव्हा मी सत्तेत होतो व जे सत्तेत नव्हते त्यांचे मागण्या मान्य करून घेण्यासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा असे मत होते ते आपल्याला मान्य नव्हते. तेव्हापासून  आपला या  संस्थेकडे संबंध राहिलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT