Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall : पावसाळ्यातही दूधसागरवर ट्रेकिंग शक्य; प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली

दैनिक गोमन्तक

Trekking On Dudhsagar Waterfall is possible in Rainy Season : प्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर आता पावसाळ्यात ट्रेकिंगला जाणे शक्य होणार आहे, तसा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाच्या विचाराधीन आलेला आहे. या धबधब्याकडे जाणारा रस्ता अभयारण्यातून जातो. या रस्त्यावर दोन ठिकाणी नदी ओलांडावी लागते.

पावसाळ्यात मोले ते दूधसागर ही जीप वाहतूक बंद ठेवली जाते. त्यामुळे पावसाळ्यात दूध सागरचे दर्शन दुर्लभ होते. केवळ रेल्वे प्रवासाद्वारे हेच दूध सागर असे दर्शन घेता येते.

या ठिकाणी पावसाळ्यात जाण्यास बंदी असतानाही रेल्वे रुळावरून अनेक जण चालत जात असत. त्यांना अलीकडेच पकडून रेल्वे सुरक्षा दल कर्मचाऱ्यांनी ताकीद दिली. त्यांनी या पर्यटकरूपी भ्रमंतीकारांना उठाबशाही काढायला लावल्या होत्या. ही बातमी देशभर व्हायरल झाल्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठली होती.

त्याची दखल घेत सनदशीर मार्गाने मोले ते दूधसागर हा गिर्यारोहणाचा मार्ग कसा खुला करता येईल, याचा विचार सरकारने सुरू केला आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर यांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे लवकरच दूधसागर वर ट्रेकिंग करणे शक्य होईल, असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT