trees of Dhavrukh organization in Goa destroyed
trees of Dhavrukh organization in Goa destroyed Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील ‘धवरूख’ संस्थेची झाडे उद्‍ध्वस्त

दैनिक गोमन्तक

मोरजी : जुनसवाडा मांद्रे पठारावरील लागवड केलेल्या ‘‘धवरुख’’ संस्थेची हजारो झाडे आगीत होरपळून उद्‌ध्वस्त करणाऱ्या ‘त्या’ कंत्राटदार कंपनीविरुद्ध अद्याप गुन्हा नोंद न झाल्याने पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्वरित गुन्हा नोंदविण्याची ग्रामस्थांतर्फे मागणी करण्यात येत आहे. याबाबत धवरुख संस्थेतर्फे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (trees of Dhavrukh organization in Goa destroyed)

आमदार जीत आरोलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. याबाबत पेडणे विभागीय वनखाते आग्रही होते. जैविक विविधता बोर्डाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

या ठिकाणी मांद्रेतील नियोजित वीज उपकेंद्र आकाराला येणार आहे. या उपकेंद्राला कोणाचा विरोध नाही, परंतु येथील सरकारी जमिनीवर डोळा ठेवून वारंवार या ठिकाणी आगी लावण्याचे प्रकार घडत आहे. गेल्या काही वर्षामागे असाच प्रकार घडला होता. त्यावर मात करून धवरुख संस्थेने या ठिकाणी पुनः वृक्ष लागवड करून सातत्याने काळजी घेत ही झाडें वाढवली होती. प्रा रुद्रेश म्हामल यांच्यासह त्यांचे सहकारी, विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी अहोरात्र राबत होत. कडक उन्हात तळपत रत्स्यावरून टँकरचे पाणी बाटल्यात भरून प्रत्येक झाडाला पुरवत होते, त्याची प्राणपणाने काळजी घेत होते, जवळ जवळ गेले किमान दशक या संस्थेने खर्ची घातले आहे आणि दहावर्षाहून अधिक काळाच्या प्रयत्नावर पाणी पडले आहे.

कारवाईची गरज

पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर म्हणाले, या षडयंत्रात सहभागी असणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे. गोवाभर अशा प्रवृत्तीची माणसे वावरत आहे, अशी कृती ही निषेधार्थ आहे.

पुन्हा झाडे लावणार

धवरुख संस्थचे अध्यक्ष रुद्रेश म्हामल म्हणाले, गेली ७-८ वर्षे ट्री ऑफ होप संकल्पना राबवताना आम्ही या ठिकाणी केवळ वृक्ष लागवड करून थांबलो नाही, तर अपत्याप्रमाणे संगोपन केले. वाळवंटात नंदनवन फुलविण्याचा आमचा प्रयत्न उध्वस्थ झाला आहे. या गावातील युवकाप्रमाणे पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे योगदान महत्त्वाचे आहे. अनेकदा आमचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले असले तरी आम्ही नावाप्रमाणे ‘ट्री ऑफ होप’ने प्रयत्न सोडलेले नाहीत, झाडे जाळली असली तरी आम्ही नव्याने झाडे लावणार आहोत. आम्हाला जैविक विविधता बोर्डाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी नवीन रोपटी उपलब्ध करून दिली आहेत, लवकरच या जागेत आम्ही लागवड करणार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT