Tree collapsed on house Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्याला वादळी वाऱ्याचा तडाखा! पडझडीत घरांचे नुकसान, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत

Goa Monsoon 2024: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याच्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यात काही प्रमाणात पाऊस कमी झालेला असला तरी राज्याच्या अनेक भागात अधुनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. पावसाने आज सकाळपासून थोडी उसंत घेतली असे वाटत होते, परंतु संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अर्धातास पणजीसह आसपासच्या भागाला पावसाने झोडपून काढले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याच्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागल्याने झाडे, वीजखांब कोसळणे, पत्रे उडून जाणे, घरांची मोडतोड असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रस्त्यावर वीजखांब तसेच झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत आहे.

ठिकठिकाणी वीज खांब कोसळल्याने तसेच काही ठिकाणी वाकल्याने वीजतारांचा रस्त्यांवर अडथळा निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कधी नव्हे एवढी झाडांची पडझड यावर्षी झाली आहे.

पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यावर रस्त्याकडेला मोठमोठे चर खोदताना झाडांचे मुळे छाटली गेल्याने आधाराविना असलेले शहरातील मोठमोठे जुनाट वृक्ष कोसळत आहेत.

घरांवर झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या

1) भाटले - पणजी येथील आरोंदकर यांच्या घरावर मोठे झाड कोसळले. सुदैवाने या घरातील महिला बचावली. महानगरपालिकेकडून अजूनही हे झाड हटविण्यात आलेले नाही.

2) कोरकणवाडा येथील ज्येष्ठ नागरिक गजानन विश्राम कोरकणकर २ यांच्या राहत्या घरावर आंबा व सागवानची दोन झाडे उन्मळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले. गजानन कोरकणकर यांच्या घराच्या वरच्या बाजूस असलेल्या सागवान झाडाच्या वजनाने आंब्याच्या झाडाची मोठी फांदी व्हारांड्यावर तर सागवान झाड बैठकीच्या खोलीवर पडले.

एका बाजूची भिंत तसेच कौले, इमारती लाकूड व अन्य बरेच नुकसान झाले. त्यामुळे या कुटुंबावर संकट कोसळले आहे. सुदैवाने त्यांचा मोठा मुलगा सत्यवान त्यावेळी घरात होता. मात्र, आवाज झाल्याने त्याने घराबाहेर धाव घेतल्याने तो बचावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

SCROLL FOR NEXT