घरावर पडलेले झाड Dainik Gomantak
गोवा

शिरोड्यात झाडे घरांवर पडून, मोठे नुकसान

25 लाखांची हानी: घरांची मोडतोड, वीज गायब

दैनिक गोमन्तक

शिरोडा: जोरदार अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे तरवळे, काराय व शिरोडा भागातील झाडे घरांवर उन्‍मळून पडून सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी टळली.

काल रविवारी रोजी साडेदहाच्‍या सुमारास तरवळे, मैंगाळ, जुन्नट, काराय व शिरोड्याच्या अन्य भागात चक्रीवादळ झाले. यात तरवळे येथील प्रकाश नाईक यांच्या घरावर वडाचे झाड व माड पडून सुमारे 3 लाखांचे तर श्रीमती नाईक हिच्या घरावर फणसाचे झाड पडून 4 लाखांची हानी झाली. कृष्णानंद लोटलीकर यांच्या घरावर माड पडून मोठे नुकसान झाले. रत्नाकर नाईक यांच्या घरावर आंबा, फणसा झाडाच्या फांद्या पडून मोडतोड झाली. यात त्‍यांना 50 हजारांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले. गीता गजा शिरोडकर, नामदेव शिरोडकर, सोनाळे येथील बस्त्यांव रॉड्रिगीस, काराय-शिरोडा येथील मिंगेल फर्नांडिस तसेच अन्‍य काही लोकांनाही या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.

दरम्‍यान, वीजखांबांवर झाडे उन्‍मळून पडल्‍याने काराय व शिरोडा भागात अंधार झाला. तरवळे भागातील माड, आंबा, फणसाची झाडे जमीनदोस्त झाली.

सुमारे 28 घरांची पडझड

या वादळामुळे शिरोडा आणि परिसरातील सुमारे 28 घरे उद्‌ध्वस्त होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सरपंच अमित शिरोडकर यांनी दिली. शिरोड्याचे आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी नुकसानग्रस्‍तांना शासनामार्फत आर्थिक सहकार्य देण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले. बोरी, लोटली, राय, पंचवाडी, बेतोडा, निरंकाल आदी गावांनाही वादळाचा मोठा फटका बसला असून आंबा, काजू पिकांचीही नासाडी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT