Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : फोंडा बोरीमध्ये झाड कोसळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

सकाळी साडेसातच्या सुमारास एक भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : फोंडा मडगाव मार्गावर बोरी येथील टॉपकोला तिस्क येथे आज गुरुवारी सकाळी अपघात झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास एक भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यात दुसरा एक दुचाकीस्वार आणि एक बस थोडक्यात बचावले.

झाड कोसळले त्यावेळेला नेमकी एक प्रवासी बसगाडी आणि दुचाकीस्वार तेथून जात होता. झाड स्स्त्यावर पडल्याने मार्गावर चांगलीच वाहतूक कोंडी झाली. स्थानिकांनी तसेच जवळच राहणाऱ्या पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेत पडलेल्या झाडाखाली अडकलेल्या दुचाकीस्वाराला बाहेर काढलं. अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी धाव घेऊन मदतकार्य केले. फोंडा अग्निशामक दलाने तसेच स्थानिकांनी झाड हटवून रस्ता मोकळा केला.

सकाळी अचानक हे झाड रस्त्यावर कोसळले. यावेळी फोंड्याहून वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या GA05 Q 8042 या क्रमांकाच्या दुचाकीवर झाडाची फांदी पडली. या दुचाकीवरुन कामाला जाणारा समाधान भीमराव यमगर (वय 29) हा ढवळी - फोंडा येथे राहणारा दुचाकीस्वार झाडाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT